Friday, December 27, 2024
Homeकृषीकाय सांगता जुन्नरमध्ये चक्क सफरचंदाची शेती ! वाचा कुठे आहे ही शेती 

काय सांगता जुन्नरमध्ये चक्क सफरचंदाची शेती ! वाचा कुठे आहे ही शेती 

जुन्नर : जुन्नर तालुक्यात सफरचंद पिकवले जातात असं तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल काय? हो पण हे खरं आहे. फळांमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या सफरचंदाची शेती चक्क जुन्नर तालुक्यात एका व्यक्तीने केली आहे.पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत अर्धा एकरात सफरचंद लागवड केली आहे. सध्या या झाडांना सफरचंद लगडली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

अशोक नामदेव जाधव, प्रणय अशोक जाधव, तुषार बाळासाहेब जाधव हे जाधव कुटुंबीय हे पारंपरिक शेतीबरोबर गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ द्राक्ष उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे त्यांची दोन्ही पदवी व पदवीधर शिक्षण घेतलेली मुले प्रणय जाधव (एम. कॉम.) व तुषार जाधव (बी. कॉम.) यांनी नोकरी, व्यवसायाच्या मागे न लागता शेतातच नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या जवळच्या काळवाडी येथील वामन या नातेवाईकाकडे सफरचंदाची झाडे बघितली आणि आपल्याही शेतात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सुमारे अर्धा एकरवर ‘HRMN-99’ या जातीच्या १५० सफरचंदाच्या रोपांची लागवड डिसेंबर २०१९ मध्ये केली. त्यासाठी एक रोप १५० रुपये याप्रमाणे १५० रोपे काश्मीरवरून मागवली. शेणखत, रासायनिक खत या रोपांना देण्यात आले. सध्या या फळबागेत चांगली सफरचंद लगडली आहे. यासाठी अंदाजे दिड लाख रुपये खर्च आला आहे. लोक सफरचंद शेती पहायला येतात, त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत असल्याचे तुषार जाधव यांनी सांगितले. यामधून चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सफरचंद गडद लाल व भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे. सफरचंद वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे. सफरचंद त्वचेसाठीही उपयोगी आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात. याचे मुख्य स्थान मध्ये एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर युरोपमध्ये हे लावण्यात आले. हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोपमध्ये उगवले जात आहे. याला यूरोपहून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते.

 ‘HRMN-99’ चा जातीचा शोध

हरिमन शर्मा हे बिलासपूर जिल्ह्यातील पणियाला गावातील प्रख्यात प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी सफरचंदाची जात विकसित केली आहे. जी सपाट, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात घेतली जाऊ शकते. या सफरचंद जातीला फुलांच्या आणि फळांच्या सेटिंगसाठी थंड वातावरणाची आवश्यकता नसते. ते बिलासपूर आणि राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत, ज्या भागात पूर्वी सफरचंदाची फळे पिकवण्याचे स्वप्नही पाहिले जात नव्हते.

1999 मध्ये हरिमन शर्मा यांनी त्यांच्या अंगणात सफरचंदाची फळे असलेली रोपे पाहिली. अंगणातील बियांची विल्हेवाट त्यांनी 1998 मध्ये गुमारवी-बिलासपूर जिल्ह्यातून विकत घेतली होती. एक नाविन्यपूर्ण शेतकरी असल्याने समुद्रसपाटीपासून 1,800 फूट अंतरावर असलेल्या पणियालासारख्या उबदार ठिकाणी फळ देणारे सफरचंदाचे झाड हे एक असामान्य निरीक्षण आहे हे त्याला जाणवले. त्यामुळे त्यांनी या वनस्पतीचे जतन केले. पुढच्या वर्षी सफरचंदाचे झाड न मिळाल्याने त्याने काही फांद्या घेऊन मनुका झाडावर कलम केले. कलमे यशस्वी झाली आणि फळांचा दर्जा चांगला होता. 2004-05 मध्ये त्यांनी शिमल्याहून खेकडा सफरचंदाची काही रोपे आणली आणि त्यांची कलमे केली. त्यांनी सफरचंदाच्या झाडांची एक छोटी बाग तयार केली जी आजपर्यंत फळे देत आहे.

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय