Thursday, December 12, 2024
HomeबॉलिवूडMushtaq Khan : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर

Mushtaq Khan : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर

Mushtaq Khan : बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांच्या अपहरणाने सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ‘वेलकम’ या चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात मुश्ताक खान यांनी विशेष स्थान निर्माण केले. मात्र आता मुश्ताक खान यांचे अपहरणाच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.

मुश्ताक खान दिल्लीत एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी अचानक एका गाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले आणि बिजनोर येथे नेण्यात आले. त्यांना बांधून ठेवत, खंडणीसाठी मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ती रक्कम न भरता, त्यांच्या मुलांनी दोन लाख रुपये ट्रान्सफर केले. ही घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली होती.

अभिनेता मुश्ताक खान यांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कसा सुटलो या बाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जवळच एक मशीद होती सकाळचा अजान ऐकून ते निघून गेले. या मोठ्या संधीचा फायदा अभिनेत्याने घेतला आणि तेथून पळून जाण्यात मुश्ताक खान यशस्वी झाले. तेथून निघून गेल्यावर त्यांनी स्थानिक लोकांकडे मदत मागितली आणि घरी पोहोचण्यात यश आले. अपहरणकर्त्यांनी तब्बल 12 तास बंदी बनवले होते.

मुश्ताक खान यांनी बिजनोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यांनी विमानाच्या तिकीटांपासून बँक ट्रान्सफर स्टेटमेंटपर्यंतचे सर्व पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. या धक्कादायक घटनेने खान यांना मोठा मानसिक आघात बसला आहे.

Mushtaq Khan

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय