Friday, December 27, 2024
HomeNewsविठ्ठल उर्फ नाना काटे लढाऊ,अभ्यासू,तरुणाईमध्ये लोकप्रिय उमेदवार

विठ्ठल उर्फ नाना काटे लढाऊ,अभ्यासू,तरुणाईमध्ये लोकप्रिय उमेदवार

टँकरमुक्त पाणी पुरवठा,जनआरोग्य,परिपूर्ण नागरी विकास हा माझा संकल्प-नाना काटे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:पिंपरी चिंचवड शहराला पुरोगामी,शाहू,फुले,आंबेडकरवादी विचारांचा मोठा राजकीय वारसा आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रेरणेतून लोकनेते शरद पवार यांनी 1998 पासून हिंजवडी आयटी पार्कच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले.2800 एकर जागेमध्ये हे विशेष जागतिक दर्जाचे विशेष औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आणि शहराचा चेहेरमोहरा बदलला. 2 लाखाहून जास्त आयटी कर्मचारी आणि त्यांची आधुनिक गृहसंकुले पिंपळे सौदागर,पिंपळे गुरव,रावेत,काळेवाडी,राहटणी,
थेरगाव,चिंचवड,वाल्हेकरवाडी,थेरगाव,डांगेचौक,वाकड,भूमकर वस्ती इ उपनगरात आहेत.त्यामुळे या मतदार संघात सर्वसमावेशक नागरी विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवत आहे.असे महाविकास आघाडीपूरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे उमेदवार नाना काटे यांनी सांगितले.

या मतदार संघात सुरवातीपासून राष्ट्रवादीचे मोठे संघटनात्मक काम आहे. विठ्ठल उर्फ नाना काटे हे वारकरी संप्रदायाचे मितभाषी,नागरीसमस्या,विविध विकास प्रकल्पाची संपूर्ण माहिती असलेले उमेदवार आहेत.त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंचवड शहरात आहे.2014 साली त्यांनी चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली आहे.चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे काम आहे.

अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले नाना काटे गेली 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.वाहतूक कोंडी,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,सामाजिक सुरक्षा,असंघटित श्रमिक वर्गाच्या घराचा प्रश्न, या मूलभूत नागरी विकासाच्या प्रश्नावर ते निवडणूक लढवत आहेत.त्यांनी मतदार संघात या मुद्द्यावर आंदोलने करून प्रशासनाला जेरीस आणलेले आहे.परीपूर्ण नागरी विकास,श्रमिकांच्या घरांचा प्रश्न,वाहतूक कोंडी मुक्त,सोसायट्यांना भेडसावणार कचरासंकलन,टँकरमुक्त पाणीपुरवठा,आरोग्यसुविधासह,सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देणारा परिपूर्ण नगरविकास हा माझा संकल्प असल्याचे नाना काटे यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय