आज जागतिक चहा दिवस. भारतामध्ये क्वचितच अशी माणसं सापडतील की ज्यांना चहा आवडत नाही .खरंतर चहा पिण्याची सवय ही इंग्रजांनी भारतीयांना लावली मात्र अजूनही चहा प्रेमी मोठ्या प्रमाणावर भारतात सापडतो.
ऑफिस, कॉलेज आणि सर्वच प्रशासकीय ठिकाणी चहा हे एक चर्चा करण्याचं माध्यम आहे. आज प्रत्येक कुटुंबाच्या टेबलवर चहाने जागा निर्माण केली आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चहा म्हणजे एक संजीवनी आहे. पाश्चिमात्य भागात जागरण करण्यासाठी कॉफी पितात तर भारतात चहाला उजवे स्थान आहे.
चहा आणि गैरसमज
चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो असं बोललं जातं. चहा प्यायल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून असे गैरसमज पसरवले जातात असं संशोधकांचं म्हणणं आहे.
चहा पिण्याचे फायदे
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील मुक्त पेशींवरील प्रभाव कमी करतात. चहासह अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. तसेच हृदयविकार, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्यांचा धोका चहामुळे बर्याच प्रमाणात कमी होतो.
चहा प्यायल्याने होणारे नुकसान
चहा प्यायचे जेवढे फायदे आहत तेवढेच तोटे देखील आहेत. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळलं पाहिजे, कारण रिकाम्या पोटी जर आपण चहाचे सेवन केले तर पित्तनिर्मिती होण्याची दाट शक्यता असते. या पित्ताचा पचन क्रियेवरही परिणाम होत असतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात जळजळीचे आणि अल्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
चहाप्रेमी रत्नदीप कल्पना गुरूदेव
बारामती
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख