पुणे : पुणे येथील लोहगाव परिसरात ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका दुकानाच्या कडेला उभी केलेली ही इलेक्ट्रीक स्कुटर पूर्ण जळून खाक झाली आहे.
लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या स्कुटर्सची मार्केट मध्ये क्रेझ वाढत आहे. गेली दोन वर्षे सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे शहरातील हजारो ग्राहकांनी स्कुटर घेणे पसंत केले आहे. देशाच्या विविध भागात इलेक्टरीक स्कुटरला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. पेट्रोल वर चालणाऱ्या वाहनांमध्ये इतर कोणते अपघात घडू शकतात याबद्दल ग्राहकांना माहीत आहे. सहसा पेट्रोल गाड्या धडक बसली तरी पेटत नाही.
व्हिडिओ : फिलिपाईन्स मध्ये ज्वालामुखीचा महाउद्रेक
नव्या घेतलेल्या इलेक्टरीक स्कुटर अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी टाकू शकत नाही. कारण लिथियम बर्स्ट झाल्यास त्यावर पाणी टाकणे योग्य असणार नाही. एक्सझोथेर्मिक प्रक्रियेमुळे आग लागू शकते.
ओला कंपनीने ओलाने आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. कंपनीने सांगितले की, “ओला एस१ प्रोला पुण्यात आग लागल्याची माहिती आहे आणि आगीच्या कारणाचा शोध घेत आहे. येत्या काही दिवसांत आणखी अपडेट्स शेअर करेल आणि योग्य ती कारवाई करेल.” मात्र सादर गाडीची नुकसान भरपाई कंपनी देईल का यावर त्यांचे अधिकृत भाष्य नाही.
ब्रेकिंग : बँकांचा 2 दिवसीय देशव्यापी संप
वाहनांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची !
या घटनेनंतर ओएलएचे म्हणणे आहे, की वाहनांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, स्कूटरमध्ये चांगल्या दर्जाची उत्पादने वापरली जातात. घटना गांभीर्याने घेतली आहे आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. लिथियम-आयन बॅटरीचे नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
पेट्रोल डिझेल ची दरवाढ सुरुच, आठवड्यात सहाव्यांदा वाढ