मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते जयंत (अण्णा) सावरकर यांच्यावर ठाणे याठिकाणी एका रूग्णालयात उपचार सुरू होते. काल संध्याकाळपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयंत सावरकर यांचा मुलगा कौस्तुभ सावरकर यांनी ही माहिती दिली. सावकरकर यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
जयंत सावरकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे ३ मे १९३६ रोजी झाला. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केले. सावरकर यांनी अपराध मीच केला, अपूर्णांक, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, लग्नाची बेडी, व्यक्ती आणि वल्ली, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले अशा शंभरहून अधिक मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, तसेच त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. आई कुठे काय करते मालिकेत आणि समांतर या वेब सीरिजमध्ये काम केले होते.
९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देखील सावरकर यांची बिनविरोध निवड झाली होती.
हे ही वाचा :
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व
विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !
विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्या दुर्घघटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !