पुणे : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे या कार्यालयांतर्गत विशेष केंद्रीय साहाय्य योजनेंतर्गत सन २०२१ – २२ मध्ये योजना राबविणेकरिता प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्राच्या पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
■ योजनेचे नाव : अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना गांडूळखत योजनेकरिता अर्थसाहाय्य देणे.
■ लाभार्थी संख्या : १२४
■ पात्रता :
१. लाभार्थी हे अनुसूचित जमातीचा असावेत.
२. लाभार्थ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र असावे.
३. विहीत नमुन्यातील अर्ज
४. लाभार्थ्याचे वय हे कमीतकमी १८ वर्षे पूर्ण असावे .
५. आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स , पासपोर्ट साईज फोटो
६. लाभाथ्यांच्या नावे स्वतःची जमीन असावी व ७/१२ आणि ८ अ उतारा आवश्यक आहे.
७. आदिम जमाती ( कातकरी ), परितक्त्या विधवा महिला, अपंग यांना प्राधान्य देण्यात येईल.
८. यापूर्वी सदर योजनेचा लाभ या विभागामार्फत व अन्य विभागामार्फत घेतला नसल्याचे हमीपत्र.
■ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत राहील.
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !
शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!
कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान