Friday, December 27, 2024
HomeNewsकृषी उत्पन्न बाजार समितीत वाढले भाज्यांचे दर; "हे" आहेत वाढीव दर !

कृषी उत्पन्न बाजार समितीत वाढले भाज्यांचे दर; “हे” आहेत वाढीव दर !

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीर व मेथीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात १६०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला (vegetables Price increased) मिळाली. सुरणच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. शेवग्याच्या शेंगांचे दर दीड हजार रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. ढोबळी मिरचीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली. घेवड्याच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे दर वाढलेले पाहायला (unseasonal rain vegetables Price increased) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४५०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४८०० रुपये


तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १६००० रुपये ते १८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७२००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये


पालेभाज्या :

कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १७०० रुपये ते २००० रुपये
कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २५००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते ३००० रुपये ३५००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २५०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

संबंधित लेख

लोकप्रिय