Wednesday, February 28, 2024
Homeजिल्हासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

युवा पुरस्कार अमोल वाघमारे, प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद यांना जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाला केली. या पुरस्कारांचे वितरण १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला करण्यात येणार आहे.

विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या युवा पुरस्काराविषयी विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुकता पाहायला मिळते. या वर्षीचा कला क्षेत्रातील युवा पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्रीयेशा देशमुखला, संशोधनातील पुरस्कार डॉ.रणजित काशिद यांना तर समाजकार्यातील पुरस्कार डॉ.अमोल वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

याव्यतिरिक्त जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभाग डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील पुरस्कार डॉ.जे.डी.पवार कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक यांना जाहीर झाला आहे. अव्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शहरी विभागातील पुरस्कार एस. व्ही.के. टी. महाविद्यालय,नाशिक यांना जाहीर झाला आहे. तर ग्रामीण भागातील पुरस्कार विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार डॉ.अश्विनी देशपांडे, डॉ.माधुरी जावळे, डॉ.चारुशीला पाटील यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट संशोधन पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ पूजा दोशी यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ.रजनीश स्वाती बार्नबस व डॉ.सुभाष अहिरे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा पुरस्कार हा डॉ. आशा बेंगाळे यांना व डॉ.दत्तात्रय शिंपी यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अध्यापक पुरस्कार डॉ.रविंद्र चौधरी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट प्राचार्य/ संचालक पुरस्कार डॉ.केशव नांदुरकर, डॉ. अदिशेशैया मेडा, डॉ.बापू जगदाळे, डॉ.पंडित शेळके यांना जाहीर झाला आहे. तर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार डॉ.विनय कुलकर्णी, डॉ.योगिनी बोरोले, डॉ.राजश्री पटवर्धन, डॉ.मनोज पाटील यांना जाहीर झाला आहे असे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.

Lic
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय