Sunday, July 7, 2024
Homeताज्या बातम्याPCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत भरती, असा करा अर्ज !

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत भरती, असा करा अर्ज !

PCMC Recruitment : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेंग्यु, चिकनगुन्या-डास नियंत्रण आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी ‘ब्रिडींग चेकर्स’ या पदाच्या ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी दि.३ जुलै ते ११ जुलै २०२४ या कालावधीत महापालिकेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डास व किटक उत्पत्तीची शक्यता अधिक असते. डास चावल्याने डेंग्यु, चिकनगुन्या आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यानुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती करण्यात येणार आहे. (PCMC Recruitment) महापालिकेच्या आकुर्डी रुगणालय, यमुनानगर रुग्णालय, भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम रुग्णालय, सांगवी रुग्णालय, तालेरा रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय अशा ८ रुग्णालयात एकूण ५६ ‘ब्रिडींग चेकर्स’ च्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

दि.३ जुलै ते ११ जुलै २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवन, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग, आवक जावक कक्षात अर्ज विहित मुदती समक्ष येऊन सादर करावा, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. (PCMC Recruitment)

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अहर्ता किमान १० वी उतीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराने अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, शासकीय किंवा निमशासकीय अथवा खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, निवासी पुरावा, उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे.

याबाबतचा सविस्तर तपशील, अनुभव, वय मर्यादा, मानधन, अटी व शर्ती तसेच विहित अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळारील आमच्या बद्दल > नोकरी विषयक या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवाराने अर्जाची प्रिंट काढून, अर्ज परिपूर्ण भरून समक्ष सादर करावा, असेही महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. ‘ब्रिडींग चेकर्स’ या पदाचा कालावधी २ महिने असणार आहे.

PCMC Recruitment

google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय