Monday, October 28, 2024
Homeलाइफस्टाइलयूपीएससी च्या धर्तीवर एमपीएससी ने घेतला 'हा' मोठा निर्णय !

यूपीएससी च्या धर्तीवर एमपीएससी ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) करण्याचा निर्णय आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी घेतला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (सी- सॅट) हा अर्हताकारी होण्यासाठी किमान ३३ टक्के गुणांची अट अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

Nokari : भारतीय टपाल विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, 7 मे शेवटची तारीख

दरम्यान राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी अनेक दिवसांपासून या निर्णयाची मागणी करत होते. UPSC च्या धर्तीवर MPSC ने असा निर्णय घ्यावा अशी अनेकांची मागणी होती. कारण काही विद्यार्थांना CSAT चा पेपर अवघड जात होता. C-SAT पेपर हा फक्त अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्यांना सोपा जात होता. या निर्णयासाठी अनेक आंदोलन झाले होते. आता विद्यार्थांच्या लढ्याला यश आले आहे. राज्यसेवेच्या मुख्य परिक्षेत मात्र कुठला बदल करण्यात आलेला नाही.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

कृषी महाविद्यालय, पाथरी येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 मे शेवटची तारीख

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

संबंधित लेख

लोकप्रिय