पुणे : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह, वर्धा, उस्मानाबाद, नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
बॉलिवूड सिंगर केके म्हणजेच कृष्णकुमार कुंन्नथ यांचे निधन !
दरम्यान, आज मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढग दाटून आले असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
टाटा आयपीएल (Tata IPL) खरंच फ्रि रिचार्ज देत आहे का? वाचा सत्य !
आजपासून राज्यात धावणार इलेक्ट्रिक एसटी बस !
आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !