Thursday, October 31, 2024
Homeराष्ट्रीयTrafic jam : दिल्लीत प्रचंड वाहतूक कोंडी, बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी झाल्याने प्रवाशांना...

Trafic jam : दिल्लीत प्रचंड वाहतूक कोंडी, बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी झाल्याने प्रवाशांना मोठा विलंब (video)

मंगळवारी राजधानी दिल्लीत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. (Trafic jam)


नवी दिल्ली : पीटीआयच्या वृत्ता नुसार बदरपूर फ्लायओव्हर, सीव्ही रमण मार्ग, पंजाबी बाग, बदरपूर मेहरौली रोड, तैमूर नगर-महाराणी बाग रोड, आश्रम आणि यमुना विहार यासह अनेक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. (Trafic jam)

धनत्रयोदशीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी झाल्याने प्रवाशांना मोठा विलंब व गैरसोयीचा सामना करावा लागला. “बऱ्हापुला उड्डाणपुलापासून सराई काळे खानच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्या विशिष्ट भागावर वाहने रस्त्यावर रेंगाळत होती.”

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी रस्त्यावर तपासणी तीव्र केली आहे. ते म्हणाले, “आम्ही गजबजलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी बाईकवर पोलीस कर्मचारी तैनात केले.

ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. बाजारपेठेत येणाऱ्या लोकांनाही त्यांनी त्यांची वाहने नेमून दिलेल्या ठिकाणी पार्क करावीत,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Traffic jam)

नॉन-शेड्युल वाहनांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश दिला जात नाही. गर्दीच्या ठिकाणी सतत अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी आले होते, “पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दलाचे दले मार्केटच्या आत आणि बाहेर तैनात करण्यात आले आहेत. गाझीपूर आणि टिळक नगरमध्येही प्रचंड वाहतूक कोंडी

दुसरीकडे, पूर्व दिल्लीतील गाझीपूर भागातील जीटीबी नगर ते निरंकारी रोडवर प्रचंड वाहतूक होती. येथे एका कारला आग लागली. टिळक नगर येथील ओम जेल रोडवरही वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागात प्रचंड वाहतूक दिसून आली.

पोलीस त्यांचे काम करत असतात, मात्र कार, मोटर चालक यांची वाढती संख्या आणि अचानक खरेदीसाठी येणारे ग्राहक कारण ठरत आहे. वाहतुकीच्या कोंडी मागे कोणते ठोस भौगोलिक कारण नसून वाढत्या लोकसंख्येनुसार वाढणाऱ्या मानवी वस्त्या, वाढणाऱ्या गाड्यांचे प्रमाण आणि अतिक्रमणामुळे अरुंद होत जाणारे रस्ते हेच कारण वाहतूक कोंडीचे कारण आहे.

देशातील मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू आदी शहरात सतत ट्रॅफिक कोंडी होत आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि सामान्य लोक परेशान होत आहेत.
दिल्ली मध्ये मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बसेस आणि इतर सुविधा असूनही लोक चारचाकी घेऊन मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात आणि स्वतःहून निर्माण केलेल्या वाहतुकीच्या सापळ्यात अडकतात. असे वाहतूक तज्ञांचे मत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय