Thursday, December 26, 2024
Homeकृषीआंध्रप्रदेशात विशाखापट्टणम, विजयवाडा आणि ओंगोल येथे हजारोंंच्या किसान महापंचायती

आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम, विजयवाडा आणि ओंगोल येथे हजारोंंच्या किसान महापंचायती

आंध्रप्रदेश : रोजी आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम (वायझाग), विजयवाडा आणि ओंगोल या तीन ठिकाणी १८ आणि १९ एप्रिल रोजी हजारो शेतकरी-कामगारांच्या प्रभावशाली महापंचायती संपन्न झाल्या. आंध्रच्या पारंपरिक पद्धतीनुसार ‘शंखरवम’ करून सभेच्या सुरुवात झाली.

महापंचायतींच्या अध्यक्षस्थानी संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी कृषी मंत्री आणि माजी खासदार, ७८ वर्षे वयाचे व्ही. एस. राव हे होते. तसेच भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. वेंकट, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस युद्धवीर सिंग, पंजाब किसान सभेचे अध्यक्ष बालकरण सिंग आणि पंजाब किसान सभेचे उपाध्यक्ष धरमपाल सिंग हे उपस्थित होते. 

१८ एप्रिलला विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेली विशाल कामगार-किसान महापंचायत १० हजाराहून अधिक लोकांची झाली. त्यात हजारो महिलांचाही सहभाग होता. वायझाग स्टील संरक्षण संघर्ष समितीने ती आयोजित केली होती. रॅली सुरू होताना आंध्रचे झुंझार स्वातंत्र्यसैनिक शहीद अल्लूरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याला वंदन केले गेले.

यावेळी देशव्यापी शेतकरी लढ्याला पाठिंबा देत असतानाच, वायझाग स्टील प्लॅन्ट हा आंध्रचा स्वाभिमान असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड कारखान्याचे १०० टक्के खासगीकरण करण्याच्या २७ जानेवारी २०२१ रोजी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध करून हा लढा जास्त व्यापक आणि उग्र करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. ३५ हजार कामगार असलेला हा कारखाना साकार करण्यासाठी १९६६ साली ३२ जण पोलीस गोळीबारात शहीद झाले होते. त्याच्या निषेधार्थ आणि हा कारखाना व्हावा यासाठी तत्कालीन कम्युनिस्ट नेते कॉ. पी. सुंदरय्या यांच्यासह ५३ कम्युनिस्ट आमदार व ७ खासदारांंनी राजीनामे दिले होते. तर इथ्तर सात आमदारांचा समावेश होता.

१९ एप्रिल रोजी सकाळी कृष्णा जिल्ह्यात विजयवाडा येथील महापंचायत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आयोजित केली होती. शारीरिक अंतर ठेवून प्रशस्त सिद्धार्थ सभागृहात ती झाली. येथे दिल्लीच्या शेतकरी लढ्यावर तयार केलेल्या एका प्रभावी प्रदर्शनाचे किसान नेत्यांनी उदघाटन केले. शेतकरी व कामगारांसोबत मध्यमवर्गीय कर्मचारी आणि तरुण मोठ्या संख्येने होते. अमरावतीच्या शेतकरी महिलांच्या एका प्रतिनिधीमंडळाने आपल्या गंभीर प्रश्नांविषयीचे निवेदन सादर केले. गेले ५०० दिवस या महिलांचा लढा अविरत सुरू आहे. 

१९ एप्रिलला दुपारी प्रकाशम जिल्ह्यात ओंगोल येथे हजारोची किसान महापंचायत झाली. शेतकरी-शेतमजुरांचा प्रतिसाद जबरदस्त होता.


संबंधित लेख

लोकप्रिय