Saturday, October 5, 2024
Homeहवामानयंदाचा एप्रिल महिना मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना !

यंदाचा एप्रिल महिना मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना !

 

पुणे : यंदाच्या वर्षी उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील लाही लाही करून सोडले आहे. त्यातच एप्रिल २०२२ चा महिना हा मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना राहिला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

रासायनिक खतांच्या नव्या किमती जाहीर ; अधिक माहितीसाठी वाचा !

उत्तर-पश्चिम मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. १ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एव्हढेच नाही तर यंदाच्या वर्षी असलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता ही २०१० वर्षानंतरची सर्वाधिक तीव्र उष्णतेची लाट असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. देशातील काही भागात एप्रिल महिन्यात सर्वाधिक उष्णतेची नोंद करण्यात आली आहे.

आधुनिक पद्धतीने ब्रोकोली शेती करून कमावले लाखो रुपये !

 

दरम्यान, आज दिनांक ३ मे रोजी अमरावती , नागपूर, भंडारा , चंद्रपूर , गोंदिया , गडचिरोली या भागाला भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात तापमान ४६ अंश सेल्सिअस पर्यन्त गेले होते. आता मात्र या भागाला आज पावसासाठी यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. मात्र नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय