Wednesday, June 19, 2024
HomeNews'वंचित' बरोबर कोणतीही चर्चा झाली नाही,शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चेत आम्ही...

‘वंचित’ बरोबर कोणतीही चर्चा झाली नाही,शिवसेना वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चेत आम्ही नव्हतो-शरद पवार

कोल्हापूर:शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्याने सेना आणि वंचितमध्ये आपापसात मतभेद झाले आहेत.खासदार संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचेच असल्याचे म्हटले होते, त्यावर राऊत यांनी आक्षेप घेतला होता.

मात्र कोल्हापूर येथे दौऱ्यावर असताना शरद पवार म्हणाले की,आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मात्र,आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दलच्या चर्चेत आम्ही नव्हतो.आहे.वंचितची ही युती केवळ ठाकरे गटासोबत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ही युती झालेली नाहीये.तसा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिशा स्पष्ट होत आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. ते म्हणाले की तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय