कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून राज्यात सातत्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. अशात आज (शनिवार) पंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले. मात्र आजही हिंसाचार बघायला मिळाला.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या हिंसाचारात आता पर्यत सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. काही समाजकंटकांनी पूर्वी बर्दवान जिल्ह्यामध्ये बरविटा प्रायमरी स्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर तोडफोड केली. काही ठिकाणी मतपेट्या पळवण्याचाही प्रकार घडला. विशेष म्हणजे काही ठिकाणी मतपेट्या जाळल्या असून तलावातही फेकून देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी बॅलेट बॉक्समध्ये पाणी टाकलं. मुर्शिदाबादमध्ये एक बूथच जमावाने ताब्यात घेतला आहे.
या हिंसाचाराच्या दरम्यान, कूचबिहारमध्ये एक व्यक्ती बॅलेट बॉक्सच घेऊन पळताना दिसत आहे. या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसा बघायला मिळाली. आता या हिंसेवरून राजकिय नेत्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे.
हे ही वाचा :
‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर
ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी
मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?
आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर