औरंगाबाद:-औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ३५० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मनपा हद्दीतील २९६ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आज १६८ जणांना कोरोनावर यशस्वी मात करून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकूण ५२२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर आतापर्यंत कोरोनामुळे ३५८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या एकूण ३२२७ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज सायंकाळ नंतर १६४ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत ९१ पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ३० आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६१ रुग्ण आढळले आहेत.
चार कोरोनाबधितांचा मृत्यू
घाटीत एन-६ सिडकोतील ४९ वर्षीय पुरुष, छावणीतील ७६ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील ४९ वर्षीय पुरुष, अन्य एका खासगी रुग्णालयात ४५ वर्षीय स्त्री अश्या एकूण चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.