Friday, December 27, 2024
HomeNewsक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या...

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते व्हावे – डॉ. रमेशजी पांडव

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर: “क्रांतीगुरु लहुजी साळवे हे क्रांतीचे प्रेरणास्त्रोत होते त्यांनी राष्ट्रकार्यासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण असून त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्यव्याप्तीवर सखोल संशोधन केले जावे. लहुजी साळवे यांच्या ८०/८५ वर्षाच्या जीवन काळात त्यांच्या विचारांचे कार्याचे आणि प्रेरणास्रोतांचे ब्रिटिश लायब्ररी आणि इंग्रजांच्या दप्तरनोंदी तपासून लहुजी साळवे यांच्या जीवनावर समाजशास्त्रीय संशोधन केले जावे आणि संशोधनाअंती लहुजी साळवे यांच्या जीवनातील न उलगडलेले पैलू समाजासमोर आणले जावेत. तसेच क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम लवकरात पूर्ण व्हावे. हे स्मारक राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान आहे.अशा थोर राष्ट्रीय महापुरुषाच्या स्मारकाच्या नियोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रम हा आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचे हस्ते भव्यसमारंभपुर्वक पार पाडवा. अशी अशा व्यक्त करतो.”पुणे येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक स्थळावर अविरतपणे सुरू असलेला तेलवात कार्यक्रमात ड‍ॅा. रमेशजी पांडव बोलत होते. पुढे ते म्हणाले की “१८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात लहुजी साळवे यांचे योगदान नक्कीच असणार आहे. लहुजी साळवे सारखे क्रांतिकारी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रमात शांत बसू शकणार नाहीत त्यांचे पुरावे शोधून काढणे गरजेचे आहे.”

याप्रसंगी संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. जगद्गुरु शिरीषजी मोरे यांच्या हस्ते लहुजी साळवे यांच्या समाधीला आदरपूर्वक तेलवात करण्यात आली. श्री. ज्ञानेश्वर पठाडे,शिवसेनेचे नेते सुनीलजी जाधव, स्नेहल जाधव, लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे प्रा. डॉ. माणिक सोनवणे मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, विशाल गवळी, हरिभाऊ उकरंडे, सनी अडागळे,विक्की लोखंडे इ. मान्यवर उपस्थित होते.

“लहुजींच्या समाधीवरील तेलवात या उपक्रमातून आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांनी पेटवलेली स्वातंत्र्याच्या क्रांतीची ज्योत भारतीयांच्या मनात सतत तेवत ठेवणे हीच लहुजींना तेलवात उपक्रमातून खरी आदरांजली ठरेल,’ असे मत व्यक्त करुन कार्यक्रमाचे आभार तेलवात समितीचे अध्यक्ष मा.सुखदेवजी आडागळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ही गोविंद भिसे यांनी लहुवंदना गावून केली.

संबंधित लेख

लोकप्रिय