Saturday, September 7, 2024
Homeआंतरराष्ट्रीयThe England riots : ब्रिटन मध्ये लीड्स शहरात जाळपोळ, हिंसाचार

The England riots : ब्रिटन मध्ये लीड्स शहरात जाळपोळ, हिंसाचार

लंडन : गुरुवारी उत्तर इंग्लंड मधील लीड्स शहर परिसरात संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात बसेस, कार्स आणि इतर वाहनांची जाळपोळ सुरू केली. (The England riots)

14 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आला आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी इंग्लंडमधील लीड्स या उत्तरेकडील शहरात प्रचंड हिंसाचार सुरू झाला. (The England riots)

द गार्डियनने प्रसारित केलेल्या वृत्ता नुसार पोलीस आणि जमाव यांच्यात दगडफेक सुरू होऊन वाहने पेटविण्यात आली. वेस्ट यॉर्कशायर पोलिसांचे म्हणणे आहे की, लीड्सच्या हॅरेहिल्स भागातील लक्सर स्ट्रीटवर गुरुवारी स्थानिक वेळेनुसार 5 वाजता लोकांची गर्दी जमू लागली, आणि हिंसाचारास सुरवात झाली. यावेळी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना स्थिती नियंत्रणात येईपर्यंत घरीच राहण्याचे आवाहन केले. (The England riots)

येथील चाईल्ड केअर संस्थेने काही मुले पालकांपासून वेगळे करून बालसुधारगृहात नेण्यात येत होती. गेल्या काही दिवसांत अनेक मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. येथील कायद्यानुसार कुटुंबाकडून मुलांचे संगोपन योग्य होत नसेल तर त्यांना प्रशासन बाल सुधारगृहात ठेवते, याच्या निषेधार्थ नागरिक संतप्त झाले. (The England riots)

सोशल मीडियावर या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात सरकारने दंगलखोरांना पिटाळून लावण्यात यश मिळविले, हजारो पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे लीड्स शहरात शांतता निर्माण झाली आहे. (The England riots)

शुक्रवारी ‘X’ वर एका पोस्टमध्ये या घटनेबद्दल तिची चिंता व्यक्त करताना, यूकेच्या गृहसचिव यव्हेट कूपर यांनी म्हंटले आहे की, लीड्समध्ये झालेला मोठा हिंसाचार, पोलिसांच्या वाहनांवर आणि सार्वजनिक वाहनांना लावलेल्या आगीची दृश्ये धक्कादायक आहेत, पोलिसांनी हा हिंसाचार नियंत्रणात आणला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय