Source : Panjab Kesari |
वाईन विक्रीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत
जुन्नर / आनंद कांबळे : किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच विभागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे. या निर्णयामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून तोट्यात चाललेल्या द्राक्ष इंडस्ट्रीला चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे असे मत कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केले.
मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक
द्राक्षापासून तयार केलेली वाईन ही आरोग्यास उपायकारक असून, ती दारू मध्ये मोडत नाही. शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली ही शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट आहे.
जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून शासनाने घोषित केला आहे. आणि सातवाहन काळापासून द्राक्षाच्या वाईनचा व्यापार या परिसरात केला जात होता. याबाबतचे पुरावे आणि वाईन साठविण्याच्या भांड्यांचे अवशेष उत्खनना मध्ये सापडले आहेत.
कोरोनाचे निर्बंध हटविण्यास सुरूवात, राज्य सरकारने केली नवीन नियमावली जाहीर
तसेच जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन देखील घेतले जाते. त्यामुळे माझी शासनास विनंती आहे. जर आपण इथल्या द्राक्ष उत्पादकांना वाईन निर्मिती लघुउद्योग करण्यास चालना दिली व थेट शेतावरच वाईन विक्रीचे सुलभ पद्धतीने व अल्पदरात परवाने दिले. तर या ठिकाणचे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, कृषिभूषण जितेंद्र बिडवई असे ही त्यांनी सांगितले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !