Tuesday, September 17, 2024
HomeNews‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

लंडन : विश्वाच्या उत्पत्तीविषयी प्राचीन काळापासूनच दार्शनिकांपासून संशोधकांपर्यंत अनेकांनी आपापले सिद्धांत मांडलेले आहेत. विश्वाचे हे कोडे उलगडण्याचा अजूनही प्रयत्न सुरूच आहे. सर्वसामान्यांना मात्र त्याचेच एक साधे रूप असलेला प्रश्न पडतो तो म्हणजे ‘अंडे आधी की कोंबडी?’

ऑक्टोपस; अवकाशातून आलेला ‘एलियन’ जीव?

अंडे आधी म्हटलं तर कोंबडीशिवाय ते येणार नाही आणि कोंबडी आधी म्हटलं की पिल्लू अंड्यातूनच बाहेर पडते! आता यावर ब्रिटिश संशोधकांनी नवे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंडे आधी असूच शकत नाही, कारण त्यामधील घटक हे कोंबडीच्या गर्भाशयातच बनतात!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

ब्रिटनच्या शेफिल्ड आणि वार्विक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‘अंडे आधी की कोंबडी’ या प्रश्नावर संशोधन केले आहे. त्यानंतर त्यांनी जगात अंडे नव्हे तर कोंबडीच आधी आली असा निष्कर्ष काढला आहे. डॉ. कोलिन फ्रीमॅन यांनी या संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की अंडे आधी आले की कोंबडी याबाबत दीर्घकाळापासून काथ्याकूट सुरू आहे.

शेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही…!

मात्र, आम्हाला असे पुरावे मिळालेले आहेत जे सांगतात की जगात कोंबडीच आधी आली. अंड्यामध्ये ‘ओवोक्लायडिन’ नावाचे एक प्रोटिन असते. या प्रोटिनशिवाय अंड्याची निर्मिती होणे अशक्य आहे. हे प्रोटिन केवळ कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होते. त्यामुळे अंड्याच्या आधीच कोंबडीचे अस्तित्व होते हे सिद्ध आहे. कोंबडीच्या गर्भाशयात ओवोक्लायडिन बनले आणि त्याच्यामुळे अंडे तयार झाले. आता कोंबडी आधी होती हे यामधून समजले असले तरी कोंबडी जगात कशी आली याचे उत्तर मात्र मिळालेले नाही!

केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले

मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक

संबंधित लेख

लोकप्रिय