Amol Kolhe : महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात मध्ये आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका. अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड, दामु घोडे, शंकर जांभळकर आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे. जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला डॉ. कोल्हे (amol kolhe) यांनी कडाडून विरोध केला.


हे ही वाचा :
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन
शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !
भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ
धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास
रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?