Friday, December 27, 2024
Homeराज्यआदिवासी तरुणीचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलनाचा...

आदिवासी तरुणीचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : आदिवासी तरुणीचा मानसिक छळ करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करुन निलंबित करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कैकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, गृहमंत्री व जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे केली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, दीक्षा उईके ही गेल्या 4 वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख ऑफिस मध्ये कार्यरत आहे. भूमी अभिलेख ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी राजू घेटे व दोन सहकारी महिला ह्या वारंवार त्रास देण्याचे प्रयत्न करीत होते. जातीवाचक बोलून अपमानास्पद बोलणे, वारंवार तू आदिवासी आहे, असे मानसिक छळ केला जात आहे. तसेच कोरोना काळात सर्वांचे पगार करण्यात आले, परंतु दिक्षा उईके यांचा पगार करण्यात आलेला नाही. एक महिला म्हणून तिला 25 हेक्टर जमीन मोजणी एकच दिवसी करण्याचे आदेश देणे, अशा प्रकारे छळ सुरू आहे. 

दिक्षा उईके यांनी होणाऱ्या त्रासाला कंटाळून 5 मार्च 2021 रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार सुध्दा दिली. परंतु पोलीस अधिकारी यांच्याकडून समज देऊन प्रकरण थाबिवले, व सर्वांना शांत केले. उलट त्रास कमी न होता. जास्तच वाढला आहे. तसेच तु पोलिस स्टेशनला गेली, माझ्या विरुद्ध वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार केली असे बोलून जास्तच त्रास देणे मानसिक छळ करणे हे सुरुच असल्याचे दिक्षा उईके यांनी सांगितले.

दिक्षा उईके यांचा मानसिक छळ करणाऱ्या आणि षड्यंत्र रचणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी पावरा यांनी केली आहे.

 

संबंधित लेख

लोकप्रिय