Friday, December 27, 2024
Homeराज्यनवे नियम : राज्यात कडक लॉकडाऊन, असे असतील नवे नियम

नवे नियम : राज्यात कडक लॉकडाऊन, असे असतील नवे नियम


मुंबई
 : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यापूर्वीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यावेळेपासूनच ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली होती. त्यानुसार आता राज्यात 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

ब्रेक दि चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील –

● लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड राहिल.

● लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये 2 तास कार्यक्रम होईल.

● आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी राहिल.

● मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने सुरू राहिल.

● सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

● खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

● लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश, आयकार्ड तपासून तिकिट मिळेल.

● खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच राहिल.

संबंधित लेख

लोकप्रिय