उत्तरप्रदेश : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला असताना उत्तर प्रदेश मधून एक अत्यंत धक्कादायक समोर येत आहे. गंगा नदी किनाऱ्यावर हजारो मृतदेह सापडले आहेत.
उत्तरप्रदेशात सध्या अत्यंत भयंकर परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण 27 जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या गंगा नदी किनारी आता अत्यंत भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंगा नदीत थेट मृतदेह फेकून सत्य लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उत्तरप्रदेश सरकारवर होत आहे. गंगा नदीच्या 1140 किनारी भागात आतापर्यंत तब्बल 2 हजाराहून अधिक मृतदेह सापडले आहेत.
गंगा नदी ही उत्तर प्रदेशातील तब्बल 27 जिल्ह्यामधून 1140 किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये प्रवेश करते. त्यापैकी कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलिया येथे सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
कानपूरमध्ये तर गंगा नदीच्या किनारी आणि पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी उघड्यावरील मृतदेहांवर गिधाडं तुटून पडत आहे. आता स्थानिक प्रशासन या मृतदेहांवर माती टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
2000 से अधिक शव गंगा में!!!
इतनी ग़रीबी है कि मृतकों के परिजनों के पास जलाने के लिए लकड़ी और कफ़न ख़रीदने के पैसे नहीं है। इसलिए शवों को गंगा जी में बहा दे रहे है या दफ़न कर दे रहे है।
कथित नीति आयोग सरकारी संपत्ति के एवज में इस पर भी कोई निजीकरण की योजना बनाने में व्यस्त होगा। pic.twitter.com/dqRcfb5w1I
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 14, 2021
नदी किनाऱ्यावरील हजारो मृतदेह पाहून प्रशासनाने उत्तर प्रदेशच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी मृतदेह नदीत न फेकता त्यांच्यावर अग्निसंस्कार करावे. यावरुन विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘प्रचंड गरीबी असल्याने लोकांकडे आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे देखील पैसे नाहीत. त्यामुळेच ते मृतेदह गंगा नदीत टाकून देत आहेत.’ अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
दरम्यान, अचानक एवढे मृतदेह कसे समोर येत आहेत याबाबत संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. तसेच एवढ्या लोकांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले आहेत याबाबत देखील नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.