उत्तरप्रदेश : आग्रा-देशात बलात्कारच्या घटना काही थांबताना दिसत नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने बलात्कारच्या घटना घडत आहेत. आता देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी नवऱ्यासोबतच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघकीस आली आहे. याबाबत महिलेने एत्मादपूर ठाण्यात तक्रार दाखल केली असून यामध्ये तीन तरुणांवर जंगलात जाऊन सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक्षक सत्यजीत गुप्ता म्हणाले की, ‘महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला लुटले. त्यामुळे सामूहिक बलात्कार, लूट आणि जीवे मारण्याच्या धमकी अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी घरी भेटले नसून त्यांना लवकरात लवकर पकडले जाईल.’
नक्की काय घडली घटना?
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे माहेर आगरातील इतमाद-उद-दौला भागात असून तिचे सासर एत्मादपूर आहे. सोमवारी संध्याकाळी सहाच्या आसपास ती आपल्या पतीसोबत बाईकवरून माहेरी जात होती. रस्त्यात तीन तरुणांनी त्यांच्या रस्ता अडवला. त्यानंतर मारहाण केली आणि जबरदस्तीने दोघांना झाडाझुडपांमध्ये घेऊन गेले. तिथे आरोपींनी महिलेला विवस्त्र केले आणि एकामागून एकाने बलात्कार केला. एवढेच नाहीतर त्यांनी घटनेचे व्हिडिओ शूटिंग देखील केले. तसेच आरोपींनी त्यांच्याजवळून १० हजार रुपये, झुमके आणि सामान लूटन फरार झाले. मंगळवारी दुपारी दोनच्या वाजल्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत छलेसर चौकात आली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.’ पोलीस अधिक्षक सत्यजीत गुप्ता, सीओ एत्मादपूर अर्चना सिंह घटनास्थळी पोहोचून तपास केला.
सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहेत. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिचा नवरा खूप घाबरले आहेत.