पुणे : राज्यातील महिला बेपत्ता झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरुन आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. राज्यात गेल्या सहा महिन्यात २४५८ मुली बेपत्ता असल्याचीही माहिती देत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.
पुण्यात पत्रकारांसमोर विविध घडामोडींवर भूमिका मांडत असताना शरद पवार यांनी राज्यातील महिला बेपत्ता होत असल्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात राज्य सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले. या काळात राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु माझ्या मते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न क्रमांक एकचा आहे. यामध्ये अनेक पोटभाग असले तरी महिला आणि मुलींवरील हल्ले हा सर्वाधिक चिंतेचा भाग आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यातील महिला बेपत्ता होण्याच्या घटनांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली असल्याचे सांगत, त्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुणे – ९३७, ठाणे -७२१, मुंबई – ७३८, सोलापूर – ६२ अशा एकूण २४५८ महिला मागील पाच-सहा महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. तसेच बुलडाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदूरबार, भंडारा, रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये एकूण ४,४३१ महिला बेपत्ता आहेत. २०२२ ते मे २०२३ या दिड वर्षाच्या काळात एकूण बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या ही ६,८८९ असल्याची ही धक्कादायक आकडेवारी त्यांनी सांगितली.
पुढे बोलताना पवार म्हणाले, माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी या भगिनींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत. ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या हवाली कसे करता येईल याची खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती
ब्रेकिंग : ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना
राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर
नोकरीच्या बातम्या वाचा :
ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती