Wednesday, July 3, 2024
Homeताज्या बातम्याMumbai : धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून...

Mumbai : धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मुंबई : भायखळा परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे या तरुणाचे नाव आहे, ज्याला झोपेत चालण्याची सवय होती. झोपेत चालता चालता इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मुस्तफा चुनावाला आणि त्याचे कुटुंबीय भायखळा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बहुमजली इमारतीत वास्तव्यास आहेत. हे कुटुंब सहाव्या मजल्यावर राहते. मुस्तफा याला झोपेमध्ये चालण्याची सवय होती. (Mumbai)

30 जून रोजी, मुस्तफा आपल्या कुटुंबीयांसोबत घरात झोपला होता. रात्रीच्या वेळी, झोपेत असताना, तो चालू लागला आणि सहव्या मजल्यावरून चालता चालता थेट तिसऱ्या मजल्याच्या गच्चीत पडला. जखमी अवस्थेतील मुस्तफा याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबिय आणि परिसरातील रहिवाशांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

भायखळा पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा यास झोपेत चालण्याची सवय असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घटना घडली तेव्हाही तो झोपेतच चालत होता, ज्यामुळे अपघात होऊन त्याचा बळी गेला. चुनावाला कुटुंबीय टॉवर नंबर 1, नेसबीट रोड, माझगाव येथे राहतात. भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. (Mumbai)

स्लीपवॉकिंग म्हणजे काय असते ?

स्लीपवॉकिंग (झोपेत चालणे) हा एक झोपेचा विकार आहे, ज्यामुळे व्यक्ती झोपेत असताना फिरू शकते किंवा असामान्य कृतीमध्ये व्यग्र राहते. हा विकार काही कुटुंबांमध्ये वारसाने येतो. स्लीपवॉकिंगचे औपचारिक नाव सोमॅम्ब्युलिझम आहे. तज्ञांच्या मते, झोपेत चालण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु हे झोपेचा विकार (पॅरासोम्निया) म्हणून ओळखले जाते.

मुस्तफा चुनावाला याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी झोपेत चालण्याच्या विकाराबद्दल अधिक जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.

Mumbai

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय