Friday, December 27, 2024
Homeकृषीशिरोमणी अकाली दलाचे नेते खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची...

शिरोमणी अकाली दलाचे नेते खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट, शेतकरी आंदोलनाबाबत झाली चर्चा

मुंबई : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज (दि.6) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली.

चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या  विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या सोडविण्यास आपण सर्वांनी सर्वोच्च  प्राधान्य दिले पाहिजे.

संबंधित लेख

लोकप्रिय