Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. देशातील अनेक प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबत शरद पवार यांनी विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तूळात एकच चर्चा रंगली आहे.

फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. अशात आता पुन्हा प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनांच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी दावा केला आहे.

काय म्हणाले Sharad Pawar ?

शरद पवार म्हणाले, पुढील काही वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय असेल, असे पवार म्हणाले. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न विचारला असता “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. असे उत्तर पवार यांनी दिले.

तसेच पुढे ते म्हणाले, मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख

लोकप्रिय