Friday, December 27, 2024
Homeजिल्हाप्राध्यापक भरती आंदोलनास एस.एफ.आय.चा पाठींबा

प्राध्यापक भरती आंदोलनास एस.एफ.आय.चा पाठींबा


पुणे
(दि.२१) :
प्राध्यापक भरती आंदोलनास स्टुडंट्स
फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.
) महाराष्ट्र राज्य समिती व पुणे जिल्हा समितीच्या वतीने पाठींबा जाहीर केला.

 

प्राध्यापक
भरती लक्षार्थ आंदोलन व महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना  यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नागपूर आणि
पुणे येथे
प्राध्यापक भरती करण्यात
यावी या प्रमुख मागणीसाठी
आंदोलन
सुरु आहे. शिक्षण संचालक कार्यालय पुणे
, येथे सुरू असलेल्या आंदोलनाला एस.एफ.आय चे महाराष्ट्र राज्य
सचिव मंडळ सदस्य विलास साबळे
,  जिल्हा
कोषाध्यक्ष सचिन साबळे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव ऍड.
नाथा शिंगाडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंब्याचे
पत्र दिले.

 

यावेळी
विलास साबळे यांनी आंदोलन कर्त्यांचे अभिनंदन केले.  ”समाजाच्या
, देशाच्या विकासातील अत्यंत महत्वाचे मुद्दे म्हणजे शिक्षण
आणि रोजगार या कळीच्या मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक
व्यक्तीचा या आंदोलनाला पाठींबा आहे.  सरकारने
लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्वरित प्राध्यापक भरती करावी. व शिक्षण
,
रोजगार आणि विकास यांचा तुटलेला सांधा जोडून व्यक्ती,
समाज आणि देशाच्या विकासातील अडथळे दूर करावेत.  सरकारच्या विद्यार्थी विरोधी, प्राध्यापक विरोधी शिक्षणधोरणांच्या विरोधात व  वेळप्रसंगी प्राध्यापक आंदोलन कर्त्यांच्या
खांद्याला खांदा लावून संघटना रस्त्यावर उतरेल व त्यासाठी लढण्याची संघटनेची तयारी
आहे
.” असे आश्वासन विलास साबळे यांनी एस.एफ.आय विद्यार्थी  संघटनेच्या
वतीने आंदोलनकर्त्यांना दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय