सोलापुर : सोलापूर जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याचा बेडरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे महिलेने आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने स्वतःचं नाव सांगत श्रीकांत देशमुख यांनी फसवल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये श्रीकांत देशमुख बेडवर बनियनवर बसलेले दिसत आहे. त्यात महिला नेत्याकडे मोबाईलचा कॅमेरा करत म्हणते की, ‘हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा’ असा आरोप केला आहे. या आरोपांमुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा राजीनामा मी स्वीकारला असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
दरम्यान, हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली असून आरोप करणारी तरुणी ही भाजपची पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे.