Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याजेष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा...

जेष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. जेष्ठ गायक गायक पंकज उधास यांचं निधन (Pankaj Udhas Passes Away) झालं आहे.वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी नायाब उधास हिने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

त्याच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.नायाब उधासने पोस्टमध्ये लिहिलं की – अत्यंत दु:खाने आपल्याला सांगावे लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झालं. ते बरेच दिवसापासून आजारी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी उधास यांना कॅन्सरचे निदान झाले होते, ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. स्वरसम्राट हरपला अशी भावना प्रेक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यांची ‘ना कजरे की धार’, ‘चांदी जैसा रंग’, ‘एक तराफा उसका घर’, ‘मैं नशे मे हू’, ‘मैं पिता नही हू’ यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती. त्यांना २००६ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया उमटत आहेत. संगीत क्षेत्रासोबतच बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय