School Holiday : उन्हाळा लागला की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची चाहूल लागत असते. आता राज्यातील शाळांना लवकरच उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी (School Holiday) चालू राहणार आहे.
महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सगळ्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी राहणार आहे. शिक्षक संचालकाने हा आदेश काढलेला आहे. तर शैक्षणिक वर्ष 2024-25 हे दरवर्षीप्रमाणे 15 जूनपासून होईल असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. परंतु शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तब्बल 1 महिना सुट्ट्या असणार आहेत.
दरम्यान, विदर्भातील तापमान विचारात घेऊन शिक्षण विभागाने विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा :
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश