सातारा : महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली.त्यमुळे महादरे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतील हे पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र ठरले आहे.
सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज
बिबट्यापासून फुलपाखरांपर्यंत वन्यजीवांचा मुक्त विहार, निखळ पाण्याचे निर्झर, पाठीशी यवतेश्वरचा डोंगर, हिरवीकच्च जंगल झाडी, कोणालाही मोहित पाडावं अशी ओळख महादरेच्या जंगलाची आहे. राजवाड्यापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. पश्चिम घाटात 360 प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी 160 प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात.
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे 106 हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. तेवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. उलट या क्षेत्राचे संरक्षण, संगोपन आणि नैसर्गिक विकासासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद शासन करेल, असे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी स्पष्ट केले.
सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !
ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी