Sarangi Mahajan : परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केले आहेत. मराठवाड्यातील मराठा आणि ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परळी विधानसभेची लढत तणावपूर्ण होण्याची शक्यता असताना या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
सारंगी महाजन यांनी दोन्ही मुंडे भावंडांवर जबरदस्तीने आणि धाक दाखवून कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील 36.50 आर जमीन, जी कोट्यवधी रुपयांची आहे, ती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी फसवणुकीच्या मार्गाने ताब्यात घेतली.
सारंगी महाजन यांनी सांगितले की, परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. त्यांना परळीतील अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून रजिस्ट्रार ऑफिसला नेण्यात आले आणि तिथे जबरदस्तीने सही घेतली गेली. तसेच, त्यानंतर गोविंद बालाजी मुंडे यांनी त्यांना घरी नेले, जेवू घातले. आणि ब्लँक पेपरवर सही करण्यास भाग पाडले. विरोध केला असता, त्यांना धमकी देण्यात आली की सही न केल्यास धनंजय मुंडे त्यांना परळी सोडून देणार नाहीत.असं सारंगी महाजन यांनी सांगितलं
सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन यांनी भाऊ प्रमोद महाजन यांच्यावर गोळी चालवली होती, ज्यामुळे प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला होता. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असताना त्यांचा २०१५ साली मृत्यू झाला.
सारंगी महाजन यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
Sarangi Mahajan
हेही वाचा :
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर