Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Sanjog Waghere : मावळ लोकसभा मतदारसंघात उषा संजोग वाघेरेही प्रचारात

खेड्यापाड्यात ग्रामस्थांच्या भेटी घेऊन साधला जातोय संवाद
मतदारसंघातील महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद

वडगाव मावळ / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) हे रिगंणात उतरले आहेत. त्यांचा संपूर्ण मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून पत्नी उषा संजोग वाघेरे मतदारसंघातील खेड्यापाड्यात जाऊन ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाशी संवाद साधून संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) यांना लोकसभेत पाठविण्याची साद घालत आहेत. या दौ-यात त्यांना महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उषाताई संजोग वाघेरे यांनी यांनी मावळ तालुक्यातील खामशेत, पिंपोळी, ताज, बोरज, पाटण, देवले आणि सदापुर गावातील ग्रामपंचायत, तसेच ग्रामस्थांच्या घरी जावून सदिच्छा भेट दिली. उषाताई वाघेरे यांचे महिला वर्गाकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार म्हणून संजोग वाघेरे पाटील मावळ मतदारसंघात बदल घडविण्यासाठी कटिबध्द आहेत.

---Advertisement---

त्यांचा निरोप घेऊन उषाताई वाघेरे मावळ लोकसभा मतदार संघात विविध गावांमध्ये आणि घरोघरी जाऊन ते आपुलकीने ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत. तसेच, मतदारसंघातील विशेषत: महिला मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना साद घालत आहेत.


या दौ-यात संगीता मरगज, शलाका माळसकर, लता गायकवाड, मनीषा कांबळे, वासंती शिंदे, भाग्यश्री कापसे, उषा शिंदे, शारदा वाघेरे, ज्योती वाघेरे, नंदा वाघेरे, रत्न पवळे, कविता सातकर, राधा सातकर, साधना गोलांडे, स्मिता वाघेरे, कांचन गोलांडे, रसिका वाघेरे, कुंदा शिंदे, गणेश मस्के, आदिनाथ वाघेरे, प्रणव वाघेरे, कृष्णा वाघेरे, अजिंक्य राक्षे, पोपट सर, आरती कुदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---


घरोघरी उध्दव ठाकरे यांचा संदेश पोहोचणार : उषा वाघेरे

उषाताई वाघेरे म्हणाल्या की, उध्दव ठाकरे साहेब यांच्या घोषणेनंतर संपूर्ण मतदारसंघात पक्षात संजोग वाघेरे पाटील हे नाव पोहोचले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक निवडणूक प्रचारात उतरले आहेत. घरोघरी जाऊन ते उध्दव ठाकरे साहेबांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत.

या कार्याचा मी देखील एक भाग आहे. आम्ही दिवसभर महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांना भेटत असताना सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, संजोग वाघेरे पाटील निवडून येतील. मावळ लोकसभेतील मतदार त्यांना लोकसभेत पाठवतील. ग्रामीण भागातील असणारे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, तसेच गावात रस्ते, वीज, पाणी असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतील, असा विश्वास उषाताई वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles