Monday, December 23, 2024
Homeग्रामीणसांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर जवळा कडलास रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर जवळा कडलास रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

डॉ. पियुष साळुंखे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली कामाची पाहणी

सांगोला (अतुल फसाले) : सांगोला तालुक्यातील सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणारा रस्ता म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, तो कडलास ते जवळा जाणारा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेसने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

या रस्त्यावरून कडलास, जवळा, घेरडी या तालुक्यातील प्रमुख गावातून हजारो नागरिक सांगोला ये-जा करीत असतात. शिवाय घेरडीहून पुढे हा रस्ता जतला जात असल्याने दररोज या रस्त्यावर सतत वाहनांचा मोठा राबता असतो. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात जागोजागी पाणी साचत आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व खासकरून दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनाने लगेच कडलास ते जवळा रोड कोरडा नदी पुलापर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 

या दुरुस्तीच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते डॉ. पियुष साळुंखे पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते सुनील गायकवाड पाटील, योगेश खटकाळे, गिरीश पाटील सर, सूर्याजी खटकाळे, महेश गायकवाड, विकास गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, आकाश ठोकळे, प्रशांत साळुंखे यांसह कडलास गावातील नागरिक उपस्थित होते.

या रस्त्यावरील वाढती वाहतूक पाहता संबंधित काम योग्य पद्धतीने आणि दर्जेदार रीत्या करून घ्यावे व आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला साचणारे पाणी निचरा होण्यासाठी पाईप टाकण्याच्या सूचना यावेळी डॉ. पियुष साळुंखे पाटील यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या. या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय