पुणे:राज्यभरातून ३ लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी आर टी ई प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत.दिव्यांग,विधवा,परितक्त्या महिलांच्या मुलांसाठी निश्चित केलेल्या टक्केवारीत जागा सोडलेल्या आहेत.राज्यामध्ये 1ल१ लाख १९५९ विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.
लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी कोणती शाळा मिळाली याबाबतचे ‘एसएमएस’ १२ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर मोबाईलवर पाठवले जाणार आहेत.त्यानंतर कागदपत्रे तपासणीचा कालावधी दि.१३ ते २५एप्रिल असेल,प्रवेश निश्चितीची मुदत दि.३० एप्रिलपर्यंत पालकांना देण्यात आलेली आहे,असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.