मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या इतर मागासवर्गीय (OBC) परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत (OBC Foreign Scholarship) एका विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्याच्या घटनेने मोठा वाद निर्माण झाला आहे. या योजनेसाठी जाहिरातीत झळकलेला विद्यार्थी रोहित दिवसे याला तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सरकारच्या योजनेवरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.
काय आहे OBC परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना ? | OBC Foreign Scholarship
महाराष्ट्र सरकारने २०१९-२० मध्ये OBC, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT), आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) यांच्या मेधावी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत २०२४-२५ साठी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२४ मध्ये अंतिम झाली होती. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)
सरकारी जाहिरातीत झळकलेला रोहित दिवसे अपात्र
या योजनेच्या जाहिरातीत रोहित दिवसे या विद्यार्थ्याचा फोटो आणि यशोगाथा ठळकपणे दाखवण्यात आली होती. मात्र, आता त्यालाच या योजनेत तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. रोहितने परदेशातील शिक्षणासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. (हेही वाचा : धक्कादायक : 73 वर्षीय आजीला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक)
याशिवाय, योजनेच्या पात्रता निकषांमध्ये वारंवार बदल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढला आहे. २०२४ मध्ये, शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर ७५% गुणांची अट लागू करण्यात आली होती, जी यापूर्वी ६०% होती. या बदलामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी आल्या. (हेही वाचा : OYO साठी नवीन नाव सुचवा आणि जिंका ₹3 लाख ; रितेश अग्रवाल यांची अनोखी ऑफर)