Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : शिवस्वराज्याभिषेक म्हणजे रयतेच्या राज्याची स्थापना – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करत शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांच्या दूरदृष्टीने व अथक प्रयत्नातून अनेक संकटे झेलत, रात्रंदिन काबाडकष्ट करून शिवरायांनी व मावळ्याने स्वराज्यासाठी रक्त सांडले, घाम गाळला आणि सुवर्णक्षण आला. (PCMC)

राज्याभिषेकाने शोषित, दबलेल्या, पिचलेल्या आणि हाताश झालेल्या रयतेला आपले राज्य आपला राजा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे सामान्यांचे रयतेच्या राज्याची स्थापना झाली असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)


कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व असंघटित कामगार, कष्टकरी ,सामान्य नागरिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजेश माने, बालाजी धामणगावे,देविदास हाके, बालाजी गवळी, अशा कांबळे, रेश्मा चव्हाण, स्वामीनाथ शेटे, प्रियांका पाटील, नेताजी चव्हाण, सुभाष कदम, सुशील राऊत, बाबासाहेब पवार, पवन ढेरे, आदी उपस्थित होते.

राज्याभिषेक ही इतिहासातील एक महान आणि क्रांतिकारक घटना आहे, सभोवताली मोगल,आदिलशहा, पोर्तुगीज ,कुतुबशहा अशांचे राज्य राज्य होते याच दरम्यान कणखर आणि दूरदृष्टीच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांच्या मार्गदर्शनातून शिवाजी यांनीं शिवराज्याभिषेकाची चा निर्णय घेतला. यालाही अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत शिवाजी महाराज हे अधिकृत राजे झाले ते छत्रपती झाले राज्य कारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला या राज्याभिषेकाने त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला, शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट झाली ना उमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास या राज्याभिषेकाने मिळाला.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles