Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, वाचा काय आहे प्रकरण !

मुंबई : प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या (Dino Morea) मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली. ही कारवाई मीठी नदी गाळ उपसा घोटाळ्याशी संबंधित आर्थिक अनियमिततांच्या तपासाचा भाग आहे. सकाळी ८ वाजल्यापासून डिनो मोरियाच्या ‘व्हिला मोरिया’ या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, यामध्ये कागदपत्रे आणि इतर पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे.

---Advertisement---

काय आहे मीठी नदी गाळ उपसा प्रकरण ?

मीठी नदी गाळ उपसा प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अंतर्गत राबवला जाणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्यामध्ये नदीच्या गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तीन महानगरपालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे बीएमसीला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)

ईडीच्या तपासात डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) डिनो आणि सॅन्टिनो यांची जवळपास आठ तास चौकशी केली होती. त्यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.  (हेही वाचा : धक्कादायक : 73 वर्षीय आजीला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक)

---Advertisement---

डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी | Dino Morea

ईडीच्या पथकाने सकाळी ८ वाजता डिनो मोरियाच्या मुंबईतील निवासस्थानी प्रवेश केला. ही छापेमारी मीठी नदी गाळ उपसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग आहे. ईडी अधिकारी कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर संशयास्पद सामग्री तपासत आहेत. याशिवाय, बीएमसीचे अभियंता प्रशांत रामुगडे यांच्यासह इतर काही ठिकाणांवरही छापेमारी सुरू आहे. (हेही वाचा : OYO साठी नवीन नाव सुचवा आणि जिंका ₹3 लाख ; रितेश अग्रवाल यांची अनोखी ऑफर)

न्यूज १८ इंडियाच्या अहवालानुसार, या प्रकरणात डिनो मोरियाच्या कॉल रेकॉर्ड्समुळे काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे ईडीचा तपास अधिक तीव्र झाला आहे. डिनोचा भाऊ सॅन्टिनो यालाही समन्स बजावण्यात आले आहे. (हेही वाचा : मोठी बातमी : १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी, वाचा कोणते आहेत देश ?)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles