पावसाळ्यात नागरिकांनी वाहने सावकाश चालवावीत
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात विविध विकास कामे प्रलंबित आहेत. रस्ते सुरक्षा संपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय खात्रीलायक राहणार नाही. देशातील सर्वात जास्त वाहनांची संख्या शहरात आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याचे तळे निर्माण होतात. रस्ते निसरडे होतात. प्रत्येक नागरिकाला वाहनांच्या वर्दळीतून लवकर निघायची घाई असते. शहराच्या विविध प्रभागात खोदाई करून ठेवल्यामुळे त्यामध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून संपूर्ण सुरक्षिततेसाठी वाहने सावकाश चालवावीत असे आवाहन चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस दिपक गुप्ता यांनी केले आहे.
पावसाळ्यात झाडे कोसळून मोठे अपघात होतात. विजेचे खांब, रोहित्र, उघडे डीपी बॉक्स इ. असुरक्षित जागा, ठिकाणे यांची पूर्वकल्पना प्रशासनाला देऊन अपघात होऊ नये यासाठी प्राधान्याने माहिती गोळा करण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँगेस करत आहे. पालिका प्रशासन, विद्युत विभाग यांच्या हेल्पलाईन वर आम्ही संपर्क करून त्या त्या ठिकाणी अपघात प्रमाण कारणे प्रशासनाला देत आहोत, असे दिपक गुप्ता यांनी सांगितले.
समाजात वेश्या व्यवसायामुळे संतुलन राहते, हे अमृता फडणवीस यांचे बेताल वक्तव्य आहे – ॲड.मनीषा महाजन
आपली काळजी आपण घेतली तर पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता कमी राहील. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहोत, असे दिपक गुप्ता म्हणाले.
– क्रांतिकुमार कडुलकर
साईश्रद्धा मंगल कार्यालयात पार पडला सहावा आंतर धर्मीय विवाह सोहळा
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख