पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील देहू येथे येणार आहेत. संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
देशाच्या इतिहासात पंतप्रधान प्रथमच देहुत येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई आणि पुणे शहरासह राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, पुण्यामध्ये बाहेरुन दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
पुण्यातील २२ वर्षीय तरूणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू, परिसरात खळबळ
पंतप्रधान मोदींच्या देहू येथील दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पायाभारणी केलेल्या संत तुकारामांच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या मंदिराची प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना पायाभारणी केली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली. संपूर्ण दगडात तेही कोरीव काम करुन हे मंदिर उभारलेलं आहे या मंदिराचे लोकार्पण उद्या होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचे आदिवासींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – वृंदा करात
साईश्रद्धा मंगल कार्यालयात पार पडला सहावा आंतर धर्मीय विवाह सोहळा
पिंपळगाव-जोगा धरणात बोट उलटून एकाचा मृत्यू