Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'हर घर तिरंगा' संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : आमदार महेश...

‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : आमदार महेश लांडगे

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’अभियान सुरू झाले आहे. याची सुरुवात स्वतःपासून करत भोसरीतील निवासस्थानी तिरंगा फडकावला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शहीदांचे, क्रांतिकारकांचे स्मरण केले. हर घर तिरंगा या अभियानातून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे यानिमित्ताने शहरातील प्रत्येक नागरिक स्मरण करणार आहे असे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हर घर तिरंगा उपक्रमासाठी पुढाकार घेतला. विविध उपक्रम राबवले. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, नितीन काळजे, राहुल जाधव, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, तसेच माजी विरोधी पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या आघाडी, युवा मोर्चा यांचे पदाधिकारी यांनी तिरंगा फडकवत मोहीम यशस्वी केली आणि स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले.

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात 13 ऑगस्ट पासून राज्यभरात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही हर घर तिरंगा अभियानाचे जोरदार स्वागत झाले असल्याचे दिसून येत आहे. भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवत देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या, जीवाची बाजी लावणाऱ्या आणि ज्यांनी या देशाचे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्व सैनिकांच्या बलिदानाचे यावेळेस स्मरण केले.

उद्योगनगरी तिरंगामय

हर घर तिरंगा या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरांमधून मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तिरंगा देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून तिरंग्याचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे शहरात आज विविध सोसायटी, विविध ठिकाणी, चौकात, विविध आस्थापना, कार्यालय यांनी ध्वज फडकवल्याचे दिसून आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय