Aurangabad Recruitment 2023 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 114
● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3. कनिष्ठ अभियंता (विद्युत) : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
4. लेखा परीक्षक : अ ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) लेखा/लेखा परीक्षक विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
5. लेखापाल : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) लेखा / लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
6. विद्युत पर्यवेक्षक : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
7. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क) : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
8. स्वच्छता निरीक्षक : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ब) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
9. पशुधन पर्यवेक्षक : अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C ) उत्तीर्ण. ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण. क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
10. प्रमुख अग्निशामक : अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) राष्ट्रीय/राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम/प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course ) पूर्ण करणे आवश्यक. क) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशामक ( Fireman ) या पदावर किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. ड ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इ ) शारीरिक पात्रता : 1) उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.) 2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) 3) वजन 50 कि.ग्रॅ. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि.ग्रॅ.) 4) दृष्टी चांगली. (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली). फ) वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीमभत्ता व युनिफॉर्म अपकीप)
11. उद्यान सहाय्यक : अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. ब ) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. क ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
12. कनिष्ठ लेखा परीक्षक : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
13. अग्निशामक : अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण. ब) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण. क) माजी सैनिकांना त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 30 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात यावी. ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इ) शारीरिक पात्रता : 1) उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.). 2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.). 3) वजन 50 कि.ग्रॅ. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि.ग्रॅ.). 4) दृष्टी चांगली. (विना चष्म्याने दृष्टी -6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली). फ) वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीमभत्ता व युनिफॉर्म अपकीप).
13. लेखा लिपिक : अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
● वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे
● परिक्षा शुल्क : अमागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.1000/- [मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी रु.900/- ] माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
● नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज