Thursday, December 12, 2024
HomeNewsदेश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप टेन घडामोडी वाचा एका क्लिक वर

देश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप टेन घडामोडी वाचा एका क्लिक वर

१) मलेशिया युरोपिय संघाविरोधात जागतिक व्यापार संघात( WTO) तक्रार करणार

कुअला लुम्पूर, मलेशिया: जगातिक पाम तेलाचे उत्पादक देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारा मलेशिया त्यांच्या पाम तेलापासून बनविलेल्या बायोइंधनावर या वर्षापासून युरोपिय संघात बंदी घालण्यात येत असल्याने जागतिक व्यापार संघात (WTO) तक्रार दाखल करणार आहे.

२)ब्रिटनने कोरोनावरील चाचणीच्या प्रक्रियेत असलेल्या लसीच्या खरेदीचे आदेश दिले

लंडन, ब्रिटन: कोरोनावरिल लस चाचणीच्या प्रक्रियेत आहे. परंतु, काही चाचण्या यशस्वी झाल्यामुळे ब्रिटनने उत्पादन सुरु होण्याआधीच १० कोटी डोस मिळण्यासाठी खरेदीचे आदेश दिले आहेत.

३)संयुक्त अरबने पहिल्यांदाच मंगळावरती त्यांचा उपग्रह पाठवण्यासाठी उडान घेतली

दुबई, अरेबिया: संयुक्त अरबने त्यांचा ‘ होप ‘ नावाचा उपग्रह जपानमधून मंगळ ग्रहावर जाण्यासाठी आकाशात सोडला. त्याला मंगळावरती पोहोचण्यासाठी ७ महिन्याचा कालावधी लागणार आहे.

४)तुर्किचे राष्ट्राध्यक्ष ईरडोगन हाजिया सोफियाचे मस्जिदमध्ये रुपांतर केल्यानंतर प्रथमच दौरा केला

इस्तानबुल, तुर्कि: हाजिया सोफिया संग्रहालयचे मस्जिदमध्ये रुपांतर करण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ईरडोगन प्रथमच तेथील दौरा केला. या दौऱ्यानंतर तेथील माध्यमांना संग्रहालयातील सर्व साहित्याला वेगळे ठेऊन तेथे नमाज पढला जातो असे राष्ट्राध्यक्ष ईरडोगन यांनी सांगितले.

५)भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिक्षदेत बदल करण्याच्या मागणीला ७५ वे संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थापना वर्ष असल्यामुळे वेगळे करण्यात आले

दिल्ली, भारत: ७५ वे संयुक्त राष्ट्राचे स्थापणा दिवस असल्यामुळे भारताची सुरक्षा परिषदेत बदल व्हावा ही मागणी तात्पुरती मागे टाकण्यात आली आहे. तसेच त्याविषयी असणारी प्रक्रिया देखील कमी गतीची होणार आहे.

६)सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलाझिझ यांना आरोग्याच्या समस्येमुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले

रियाध, सौदी: सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलाझिझ यांना २०१५ पासून नेहमी चाचण्या झाल्यावर उपचार केले जात होते. राजा बनन्यापूर्वी त्यांनी रियाधचे गव्हर्नर म्हणून ५० वर्ष काम पाहिले होते.

७)ऑक्सफर्डने तयार केलेली कोरोनाविरोधी लस प्रतिकारशक्ती वाढवते असे पहिल्या चाचणीतून दिसून येते

लंडन, ब्रिटन: जगाचे लक्ष लागलेली कोरोनाची लस ऑक्सफर्ड मध्ये तयार होत असून ती १८ ते ५५ वर्षाच्या व्यक्तीमध्ये दोन पातळीवरती प्रतिकारशक्ती तयार करते असे पहिल्या चाचणीतून सिद्ध झाले.

 ८)ऑस्ट्रेलियाने कोरोनाचा प्रार्दुभाव थांबन्यासाठी अजून काही आठवडे थांबावे लागणार 

सिडनी, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना प्रार्दुभाव थांबवण्यासाठी अजून काही आठवडे लागतील असे सरकारकडून सांगितले जात आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसत आहे त्यामूळे सरकारकडुन सदर माहिती पुरवण्यात आली.

९)ट्विटरने १३० लोकांची खाती हॅक झाल्यावर त्यांची जाहिर माफी मागितली

न्युयॉर्क, अमेरिका: ट्विटरने खाती हॅक झाल्यामुळे १३० लोकांची जाहिर माफी मागितली. काही दिवसांपूर्वी १३० जागतिक प्रभावी व्यक्तींची खाती हॅक झाली होती. 

१०)इंडिगो त्यांच्या कर्मचाऱ्यांमधून १०% कर्मचारी कमी करणार: मुख्य कार्यकारी अधिकारी इंडिगो

दिल्ली, भारत: कोरोना प्रार्दुभावामुळे इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीला खुप तोटा झाला आहे. तसेच अजून ही काम चालु झालेले नाही असे कारण सांगत कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय