Sunday, September 8, 2024
HomeNewsदेश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप सेवन घडामोडी वाचा एका क्लिक वर

देश विदेशातील आजच्या महत्त्वाच्या टॉप सेवन घडामोडी वाचा एका क्लिक वर

१. टर्कीकडून भारताच्या अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा टीका.

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे जम्मू – काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णय. या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले . त्या निमित्ताने टर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका केली.

२. चीनची क्षेपणास्त्र चाचणी; अणु हल्लाही होऊ शकतो!

बिजिंग – भारतासह अमेरिका आणि इतर अनेक देशांसोबत सध्या चीनचे तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत चीन आशियामध्ये युद्ध भडकवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. चीनने अणु हल्ला करू शकेल अशा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. चीनच्या आर्मी रॉकेट फोर्सने नुकतंच युद्धाभ्यासावेळी डीएफ २६ आणि डीएफ १६ क्षेपणास्त्रांची चाचणी केली. ही चाचणी केव्हा आणि कुठे झाली याची माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

३. मिशेल ओबामा यांना सौम्य नैराश्य.

अमेरिका : कोरोना संकट, वर्णद्वेष आणि ट्रंप प्रशासनाचा ‘दांभिकपणा’ यामुळे आपल्याला नैराश्य आल्याचं अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी म्हटलं आहे. आपण सौम्य स्वरुपाच्या नैराश्याचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘स्वतःला ओळखणं’ आणि ‘आनंद देणाऱ्या गोष्टी करणं’, यातून ‘भावनिक चढ – उतार’ यशस्वीपणे हाताळता येतात, असंही त्या म्हणाल्या आहेत. दैनंदिन व्यायाम आणि झोप यांचं रुटीन बिघडल्याचं मिशेल ओबामा यांनी सांगितलं आहे.

४. चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर…

बीजिंग (चीन) : चीनमधील वुहान शहरामधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने लाखो नागरिकांचा जीव घेतला असून, त्यावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमध्ये आणखी एक व्हायरस आला असून, या व्हायरसची लागण होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. एसएफटीएस व्हायरस (SFTS Virus) असे या व्हायरसचे नाव आहे.

५. बैरुत स्फोट : मृतांचा आकडा 135 वर, पोर्ट अधिकाऱ्यांना केले स्थानबद्ध.


लेबनन : लेबननच्या राजधानी बैरुत येथे झालेल्या स्फोटात 135 जण ठार, शेकडो जखमी झाल्याचं लेबननच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे. सरकारने दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. मंगळवारी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास कार्याला वेग आला आहे. बैरुत बंदरावर झालेल्या स्फोटानंतर बंदर अधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

६. फेसबुकने डिलीट केली डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोनासंदर्भात भटकवणारी पोस्ट.


वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी आधीपासूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली असतानाच आता त्यांच्याविरोधात सोशल मिडियाने देखील कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता फेसबुकने ट्रम्प यांची कोरोना व्हायरसबाबत भटकवणारी पोस्टच उडविली आहे . कोरोनाबाबत अफवा पसरवण्यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. फेसबुकने अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना बनविली असून त्यानुसार अशा भटकवणाऱ्या पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील आज त्याचा प्रत्यय आला आहे.

७. गुगलचा चीनवर व्हिडिओ स्ट्राइक, २५०० यूट्यूब चॅनेल केले डिलीट.


चीन : सर्च इंजिन गुगलने चीनशी संबंधित २ हजार ५०० यूट्यूब चॅनेल डिलीट केली आहेत. हे चॅनेल्स दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे व्हिडिओ शेअरींग प्लॅटफॉर्म यूट्यूबवरून हे चॅनल्स हटवले आहेत, अशी माहिती गुगलने दिली आहे. ही कारवाई चीनसाठी काम करणाऱ्या या चॅनल्सच्या तपासणीचा एक भाग असून हे यूट्युब चॅनल्स एप्रिल ते जून दरम्यान हटवण्यात आल्याचीही माहिती गुगलने दिली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय