Wednesday, May 22, 2024
Homeग्रामीणमा.आ.डाँ भाई गणपतरावजी देशमुख यांना "आबासाहेब वीर " पुरस्कार जाहीर

मा.आ.डाँ भाई गणपतरावजी देशमुख यांना “आबासाहेब वीर ” पुरस्कार जाहीर

जि:सोलापूर

 सांगोला : जेष्ठ स्वातंत्र सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल   गेले 23 वर्षे “आबासाहेब वीर” पुरस्कार प्रदान करण्यात येतो.सदर पुरस्कार किसन वीर सातारा सहसाखर कारखाना यांच्या वतीने देण्यात येतो

यंदाचा 24 वा “आबासाहेब वीर”

पुरस्कार हा सांगोल्याचे लोकप्रिय नेते ज्यांच नाव भारतीय राजकारणात आदबीने घेतले जाते ते डाँ भाई गणपतरावजी देशमुख यांना जाहीर झाला आहे.एक लाख रुपये व सन्मान पत्र आसे पुरस्काराचे स्वरुप आहे.

    कोरोना महामारीच्या संकटामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार नाही ,सदर पुरस्कार हा मा.आ.डाँ भाई गणपतरावजी देशमुख ह्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्याचा निर्णय संचालक मंडळात घेण्यात आल्याची माहिती किसन वीर सातारा कारखान्याचे आध्यक्ष मा.मदन भोसले यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय